चला अनुभव घ्या शून्य छाया दिवसाचा.
कृती
एक पोकळ पाईप घेउया.
मोबाईलचा टॉर्च वापरून या पाइपची सावली बघता येईल.
टॉर्च पाईपच्या वरून नेल्यास सावली कधी रेषेच्या या बाजूस व कधी त्या बाजूस पडते.
जेव्हा टॉर्च पाईपच्या बरोबर वरती असतो तेव्हा मात्र त्याची सावली दिसतच नाही.
हा पाईप आपण पारदर्शक प्लास्टिक वर ठेवून बघ्या.
परत मोबाइल टॉर्च फिरवला तरी हेच घडते,
जेव्हा टॉर्च पाईपच्या बरोबर वरती असतो तेव्हा मात्र मात्र आपल्याला एक वॅर्तुळ खाली दिसते.
सावल्यांचा बबल पण असेच काही घडते
खरेतर , रोज दुपारी सूर्य डोक्यावर असला तरी सावली काही बरोबर खालती पडेलच असे नाही. बहुतेक वेळ मध्यान्हाच्या वेळी हि सावली थोडी झुकलेली असते . फक्त वर्षातले दोन दिवस सोडून .
हेच ते शून्य छाया दिवस. कसे व का हे थोडे नंतर.
चला पटकन छोट्या कृतीतून ह्याचा अनुभव घेऊन बघू
लाकडी फळी घेऊन त्यावर सायकलचे स्पोक लावले. एक पारदर्शक प्लास्टिक त्यावर ठेवले. यावर काही पोकळ वस्तू पण ठेवल्या.
जेव्हा सूर्य बरोबर वरती येईल, तेव्हा या कागदावर वस्तू प्रमाणे आकार दिसतील.
दंडगोल असेल तर वर्तुळ
चौकोनी पाईप असेल तर चौकोन
हे फक्त दुपारी काही क्षणासाठीच ह, शून्य छाया दिवस असेल तेव्हाच
इतर वेळी मात्र हेच आकार थोडेसे तिरपे किंवा वाकलेले दिसतात.
याशिवाय तुम्ही या इतर गोष्टींचा वापर करून पण अशी कृती करू शकता
उन्हात नेहमी टोपी व चप्पल घालायला विसरू नका. आणि हो सूर्याकडे थेट कधीच बघायचे नाही.
सावल्यांचा खेळ नेहमी दुसऱ्या सावलीच्या मदतीनेच बघायचा बर का .
चला तर आता बघूया असे का घडते ?
तुम्हाला माहिती आहे कि पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तशीच स्वतःभोवतीही.
पृथ्वीचा अक्ष २३.५ अक्षातून कललेला आहे. हेच ऋतू बदलाचेही कारण आहे.
यामुळेच रोज, सूर्य वेगळ्या ठिकाणाहून उगवतो व मावळतो.
असे करत तो दक्षिणे कडून उत्तरेकडे व परत असा प्रवास करतो , यालाच आपण उत्तरायण व दक्षिणायन असेही म्हणतो.
या प्रवासात दोनच वेळा तो आपल्या बरोबर डोक्यावर असतो. तो दिवस म्हणजे शून्य छाया दिवस.
या सिम्युलेशन मध्ये सावली कशी बदलते ते बघता येईल
तुमच्या ठिकाणाच्या अक्षांश नुसार वेळ व तारीख वेगळी असेल. हे तुम्ही इथे पाहू शकता .
ही घटना कर्क वृत्त (23.5० उत्तर) व मकरवृत्त( 23.5० दक्षि ण)
यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मि ळते.
ZSD अँपच्या साहायाने याबद्दल अधिक माहिती मिळेल.
7 वी च्या विज्ञानाच्या पुस्तकात 117 पानावर शून्य छाया दिवसाबद्दल ( Zero Shadow Day )माहिती आहे.
आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचविल्यास त्यांना हे अनुभवता येईल.
वार व स्थानिक दुपारची वेळ खालीलप्रमाणे
वाशीम २० मे १२:१८
चंद्रपूर २० मे १२:०९
यवतमाळ २२ मे १२:१४
बुलढाणा २३ मे १२:२२
अकोला २४ मे १२:१९
अमरावती २५ मे १२:१६
नागपूर २६ मे १२:१०
भंडारा २६ मे १२:०८
गोंदिया २८ मे १२:०६
Pune 13 May 12:31
Mumbai 16 May 12:35
Thane 16 May 12:34
Aurangabad 19 May 12:25
Nasik 20 May 12:31
Akola 24 May 12:19
Nagpur 26 May 12:10
नाशिक २० मे 12 वाजून 31 मि.
Let us place this hollow PVC pipe here.
We will use the flashlight of a mobile phone to create a shadow.
Shadow appears on either side of the line as I move the flashlight.
If I move the flashlight exactly above this pipe, I can not see the shadow.
I can put this pipe on the transparent sheet and get the same result. This time I see a circle below when a flashlight is held exactly above the pipe.
Something like this happens in real life as well.
We see shadows all the time. But they appear sideways at noon , except for 2 days. These two days are called zero shadow day, a day when shadow disappears for some time.
Why it happens we will see later.
Let us do the setup first.
We will fix these cycle spokes to the wooden base and place an acrylic sheet on it.
We will take some hollow shapes and place it on the top.
Let us watch shadows as SUN moves above us.
On the zero shadow day, based on location, when the Sun is exactly at the top, you will see, full circle as a shadow of the pipe.
You can do your setup with these everyday things as well.
Outside, It's always advisable to wear chappals or shoes and put a cap on your head. You can take help of other shadows as well.
Now lets us explore why it happens only twice a year.
As you know earth is rotating around the Sun and around itself.
Its axis is tilted by 23.5 degrees. This is the reason for seasons and Sun shifting positions as it rises and sets every day.
Sun rises at different times and locations throughout the year.
In this simulation, you can see how shadow changes at noon throughout the year. You can enter your location and try it out.
Hope that helps. !
Thank You.
Link to simulation : https://ccnmtl.github.io/astro-simulations/sun-motion-simulator/
Find Zero Shadow day at your location.
No comments:
Post a Comment