Featured post

Making Effective Science Videos

Monday, 7 February 2022

मराठी महिने / अधिक महिना

 पहिल्या भागात सूर्य,पृथ्वी व चंद्रामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या घटना मॉडेलच्या मदतीने समजावून घेतल्या.

 या भागात जाणून घेउया भारतीय पंचांगातील महिने व साधारणपणे दर पावणेतीन वर्षांनी येणारा अधिक महिना .





आपल्या परिचयाचे  इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. 


पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. 


या दिवसांना १२ भागांत विभाजन करून १२ महिने ठरविले गेले.  काही ३१ दिवसांचे तर काही ३० . फेब्रुवारीचा फक्त २८ किंवा २९ दिवसांचा.


पृथ्वीचे स्थानपण प्रत्येक महिन्यात त्याच ठिकाणी. जसे २1 मार्च, २२ जुन,  २२ सप्टेंबर आणि २२ डिसेंबर 


भारतीय पंचांगात महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरतात.


अनेक धर्माचे सण आणि उत्सव चांद्र महिन्याप्रमाणे साजरे केले जातात. या सणांचे नाते विशिष्ट ऋतूंशीही कायम राहावे, यासाठी कालगणनेत ‘अधिक महिना’ आला. 


भारतीय कालगणनेतील महिने व अधिक महिना कसा येतो हे समजावून घेऊया कॅलेंडर च्या मदतीने 


साल आहे २०२१ आणि महिना आहे एप्रिल . 


१२ एप्रिल ला अमावस्या होती. चंद्राची जागा अमावसेच्या ठिकाणी .




अमावास्येपासून परत आमावास्येपर्यंत लागणारा वेळ , हाच आपला एक मराठी महिना , यालाच चांद्रमास असे पण म्हणतात, 


सुरवात करूया गुढीपाडव्यापासून.


मीन राशीत सूर्य असताना ज्या चंद्रमासाचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणतात. 


१३ एप्रिल पासून चैत्र महिना सुरु झाला.


पहिला दिवस  चैत्र शुक्ल प्रतिपदा 


२७ एप्रिल ला पौर्णिमा आणि ११ मे ला अमावास्या.


एका चांद्र महिन्यात ३० दिवस. एका दिवसाला तिथी असेही म्हणतात . 


पण तिथी कशी ठरवितात. ? 


 चंद्र हा सूर्यापेक्षा जलद गतीने जाणारा,  त्यामुळे या दोघांमघील अंतर एका अमावास्येपासून वाढत वाढत ते दुसऱ्या अमावास्येपर्यंत ३६०° म्हणजेच पुन्हा ०° होते. ३६०° चे ३० समान भाग पाडले म्हणजे प्रत्येक भाग १२° चा झाला.


प्रत्येक १२ अंशांचे अंतर पडण्यास जो कालावधी लागतो, त्याला तिथी म्हणतात. 


१२ अंश अंतर गेल्यावर प्रतिपदा ,  २४ अंश गेल्यावर द्वितीया ….


अंशात्मक अंतराच्या दृष्टीने पाहिल्यास तिथी सारख्याच म्हणजे बारा बारा अंशाच्या असल्या, तरी चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे व असमान गतीमुळे तिथींचा कालावधी असमान असतो , म्हणजे २० ते २७ तासांची तिथी असू शकते . या उलट इंग्रजी वर्षात 24 तासांचा दिवस असतो.


180 अंश झाल्यावर पौर्णिमा आणि ३६० अंश झाल्यावर परत अमावस्या . म्हणजेच पुढल्या महिन्याला सुरवात .


अमावास्येनंतर चंद्र पूर्वेच्या दिशेने पुढे सरकताना, आपल्याला चंद्राचा अधिकाधिक प्रकाशित भाग चंद्रकोरीच्या स्वरूपात दिसायला लागतो. याला आपण शुक्ल पक्षातील चंद्र असे संबोधतो.


या काळात येणाऱ्या तिथीच्या आधी शुद्ध हा शब्द लावतात 


या ठिकाणी चंद्र असेल तर शुद्ध प्रतिपदा


या ठिकाणी चंद्र असेल शुद्ध द्वितीया


या ठिकाणी चंद्र असेल शुद्ध अष्टमी 


पौर्णिमेनंतर चंद्र कक्षेत पुढे गेल्यावर त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. याला आपण कृष्ण पक्ष असे म्हणतो. या काळात येणाऱ्या तिथीच्या आधी वद्य हा शब्द लावतात 



वद्य प्रतिपदा


वद्य द्वितीया


वद्य  अष्टमी 


चला पुढे जाऊया 


१२ मे पासून वैशाख महिना सुरु होतो , या महिन्यात २६ मे ला पौर्णिमा 


१० जून ला अमावस्या - 


जेष्ठ महिना सुरु झाला 


२४ जून ला पौर्णिमा 


प्रत्येक चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण होते. 


जसे चैत्र महिन्यात मीन राशीतून मेष राशीत , वैशाख महिन्यात वृषभ राशीत आणि जेष्ठ महिन्यात मिथुन राशीत , 


हे संक्रमण जर झाले नाही तर त्यावर्षी अधिक महिना येतो. 


चंद्राच्या १२ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या कि एक चंद्र वर्ष पूर्ण होते व परत चैत्र महिना सुरु होतो 


२०२२ मधे ०२ एप्रिल ला चैत्र महिना सुरु होतो , गुढीपाडवा हा सण या वर्षी १० दिवस आधी आला. याचे कारण मराठी महिना हा २९. ५ दिवसांचाच असतो 


असेच महिने पुढे सरकत गेले तर २०२३ ला गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिना २२ मार्च ला येतो. या वर्षी गुढीपाडवा २०२१ च्या पेक्षा अंदाजे २२ दिवस आधी आला . 

असाच क्रम सुरु राहिला तर दरवर्षी गुढीपाडवा अलीकडे येत जाईल. आणि  होळीचा सण पावसाळ्यात साजरा करण्याची वेळ येईल. पण असे होत नाही कारण अधिक महिना …


चला पुढे जाऊया 


वैशाख 


जेष्ठ 


आषाढ 


१७ जुलै ला अमावस्या आणि सूर्य आहे कर्क राशीत  १७ ऑगस्ट २०२३ ला , चंद्राची एक प्रदक्षिणा झाली तरी सूर्य कर्क राशीतच आहे. म्हणून हा अधिक महिना. 


या नंतरचा महिना तोच धरतात . श्रावण - आता सूर्य पुढील राशीत म्हणजे सिंह राशीत आहे 


आणि पुढे बाकीचे महिने त्याच क्रमाने येतात. 


असेच जर आपण पुढे जात राहिलो तर २०२४ मध्ये ०९ एप्रिल ला गुढीपाडवा येईल 


साधारण पणे त्याच वेळेस - २०२१ ला होता तसा


अधिक महिन्यामुळे चांद्र कालगणनासुद्धा सौर कालगणनेशी स्वतःला जुळवून घेते. २००० सालापासून पुढील १० वर्षे जर चैत्र महिना कधी आला हे बघितले तर साधारण या टप्प्यात . म्हणजेच सूर्य कायम मिन राशीत होता . 


आपण सूर्याचे राशी संक्रमण बघितले तसे चंद्राचे नक्षत्र संक्रमण पण महत्वाचे आहे.. कोणत्या राशीमध्ये कोणती नक्षत्रे हे ठरलेले असते. पण यासंबंधी अधिक माहिती पुढल्या भागात ... 


धन्यवाद 


No comments:

Post a Comment