Featured post

Making Effective Science Videos

Wednesday 9 February 2022

सूर्य,पृथ्वी व चंद्र - मॉडेल

 सूर्य,पृथ्वी व चंद्रामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या घटना मॉडेलच्या मदतीने समजावून घेऊया  



त्यासाठी वापरले आहेत वेगवेगळ्या आकाराचे चेंडू, मणी आणि आणि खूप सारे gears. 


सुरवात अर्थातच पृथ्वीपासून.  पृथ्वी सूर्य व चंद्राकडे आपण आकाशातून खाली बघत आहोत असे समजूया 


पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पण घडाळ्याच्या काट्यांप्रमाणे म्हणजेच clockwise नाही तर उलट दिशेने म्हणजे anticlockwise .


परिभ्रमण करता करता पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते,. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. 


पृथ्वीचा आस हा सरळ नसून थोडा तिरका आहे म्हणजे आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे.  तिच्या कक्षाकडे २३.५ अंशातून 


पृथ्वी पण स्वतःभोवती  anti-clockwise फिरते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. 


पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याऐवजी पूर्वे कडून पश्चिमेकडे फिरली तर काय होईल ? विचार करा . 


स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास २४ तास लागतात. 


तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो.  


या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू क्रम सुरू असतात.


या वेगवेगळ्या घटना समजावून घ्यायच्या तर नुसतेच आकाश काय कामाचे. ? चला एक वर्तुळ ठेवूया.  


सूर्यमालेच्या चहूबाजूस असंख्य तारकापुंज आहेत. आपलय पूर्वजांनी यातील काही ठराविक तारे निवडले व त्यांना नावे दिली. यालाच आपण कॉन्स्टिल्लाशन्स म्हणतो . पण सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमण मार्गातील १२ च विचारात घेतली जातात. जशा कि आपल्या बारा राशी. वर्तुळाचे १२ भाग  पाडले. एक भाग एक राशी. आपल्या रोजच्या वापरातील इंग्रजी महिने या छोट्याश्या चकती वर काढले आहेत. हे ऋतूंचा अभ्यास करताना उपयोगी पडतील 


राशींची मांडणी या क्रमाने केली आहे. मेष वृषभ मिथुन कर्क ....  


आणि महिने जानेवारी , फेब्रुवारी .... 


पृथ्वीला हाताने टप्प्या टप्प्यात फिरवत तिचा आस कसा झुकलेला आहे ते बघूया 

.

आसाची स्थिती वरून बघण्यापेक्षा बाजूने बघितल्यास जास्त चांगली कळते. 


सुरु करूया २१ जून पासून 


21 june.


हे विषुववृत्त , पृथ्वीला दोन भागात विभागणारी काल्पनिक रेषा , वरचा भाग उत्तर गोलार्ध तर खालचा दक्षिण गोलार्ध 


उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस.  पृथ्वीचा उत्तर धृव हा 21 जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यामुळेच  उत्तर गोलार्धात पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो.दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते. 


या विरुद्ध परिस्थिती दक्षिण गोलार्धात असते, दिवस लहान तर रात्र मोठी.  यादिवशी ग्रीष्म ऋतूस सुरवात होते. समर  solistice असेही म्हणतात 


22 september


 या स्थितीत  कोणताही गोलार्ध सूर्यकड़े कललेला नसतो.  या दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असल्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव-दिन असेही म्हणतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्र्चिमेस मावळतो. यालाच शरद संपात / Winter Equinox असेही म्हणतात  या दिवशी शरद ऋतूस सुरवात होते 


22 December


पृथ्वीचा उत्तर धृव सूर्याच्या सूर्याच्या विरुद्ध  दिशेने  कललेला असतो. उत्तर गोलार्धात रात्र मोठी व दिवस लहान असतो.  या दिवशी शिशिर ऋतूस प्रारंभ होतो. याउलट दक्षिण गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस व सगळ्यात छोटी रात्र असते. Yalach winter solistice pan mhantaat  


21 March

 या स्थितीत  कोणताही गोलार्ध सूर्यकड़े कललेला नसतो.  या दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असल्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. यालाच वसंत संपात दिन असेही म्हणतात. vernal equinox . या दिवशी वसंत ऋतूस सुरवात होते  




२१ जूनपासून २२ डिसेंबरपर्यंत तो दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक दक्षिणेस गेलेला दिसतो; तर २२ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत तो दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक उत्तरेस गेलेला दिसतो. सूर्याच्या या उत्तरेकडून दक्षिणेकडे (२१ जून ते २२ डिसेंबर) आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे (२२ डिसेंबर ते २१ जून) होणाऱ्या भासमान भ्रमणाला अनुक्रमे दक्षिणायन व उत्तरायण म्हणतात. 


चंद्र

हा छोटा मणी म्हणजे आपला आवडता चंद्र .


चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांसोबत सूर्याभोवती फिरतात. 


चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस लागतात.


चंद्र हा स्वयंप्रकाशित वस्तू नाही. चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो, तो परावर्तित होतो, त्यामुळे चंद्राचा तेवढाच प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसतो. चंद्राच्या परिभ्रमणा मुळे हे प्रकाशित चंद्रबिंब वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसते, त्यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो.

अमावस्या आणि पौर्णिमा 


सूर्य आणि चंद्र हे जेव्हा पृथ्वीच्या संदर्भात एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात, तेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. त्यामुळे या स्थितीत आपल्याला चंद्राचे बिंब १००%  प्रकाशित दिसते. याला आपण पौर्णिमा म्हणतो. 


अमावास्येला  चंद्राचा प्रकाशित भाग हा आपल्या विरुद्ध बाजूला असतो. तर अंधाराचा भाग आपल्याकडे. अर्थात तेव्हा चंद्रबिंब अंधारलेले असते. या स्थितीमध्ये सूर्य आणि पृथ्वी  यांच्यामध्ये चंद्र असतो.


आणखीन एक महत्वाची घटना म्हणजे ग्रहण 


 अमावास्येच्या स्थितीमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अशी सरळ रेषेत स्थिती असते.  जर ते एकाच प्रतलात आले, तर अशा वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. जिथे ती सावली पडते, त्या सावलीच्या भागातून सूर्यग्रहण दिसते.


या स्थितीमध्ये जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका समान प्रतलात आले, एका रेषेत आले, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते.


हे प्रतल एकसमान असते तर दर अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणं झाली असती. पण चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. यामुळे काही वेळा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या प्रतलांपेक्षा कधी वरती तर कधी खालती असतो . त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही.


सूर्यग्रहण अमावास्येच्या आसपास होते जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. याउलट चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. 


शुक्ल पक्ष / कृष्णपक्ष 


चंद्राच्या बदलत्या कला ओळखणे सोपे जावे म्हणून हि एक गोलाकार चकती लावूया. 


अमावास्येपासून परत आमावास्येपर्यंत लागणारा वेळ , हाच आपला एक मराठी महिना , यालाच चांद्रमास असे पण म्हणतात, 

चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो.



अमावास्येनंतर चंद्र पूर्वेच्या दिशेने पुढे सरकताना, आपल्याला चंद्राचा अधिकाधिक प्रकाशित भाग चंद्रकोरीच्या स्वरूपात दिसायला लागतो. याला आपण शुक्ल पक्षातील चंद्र असे संबोधतो


पौर्णिमेनंतर चंद्र कक्षेत पुढे गेल्यावर त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. याला आपण कृष्णपक्ष असे म्हणतो.

सन्मुख बाजू


चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू (सन्मुख बाजू) पृथ्वीच्या दिशेला असते.  या बाजूला एक लाल उभी रेघ काढूया .पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा केली तरीही हा बिंदू हालत नाही.


मकर संक्रांति 


मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो .प्रवेश करतो म्हणजे नक्की काय ?


खरं तर सूर्य हा निश्चल आहे. पण पृथ्वीच्या भ्रमणामुळे आपल्याला सूर्य फिरत असल्याच्या भास होतो. दूरवर असणारे अनेक तारकासमूह पण बहुतेक निश्चल आहेत. या तारकासमूहांचा संदर्भ धरून आपण सूर्याची स्थिती ठरवतो.  

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत असा प्रवेश करतो 


इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते, 


No comments:

Post a Comment