Sun Earth Moon
Installation
Usage
सहस्रचंद्रदर्शन हा पोर्णिमेशी संबंधित असलेला आणखीन एक समारंभ.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येऊन गेल्या की हा समारंभ करता येतो. व्यक्तीच्या आयुष्यात या पौर्णिमा फक्त यायला हव्यात, त्या पौर्णिमांच्या दिवशी त्याने चंद्रदर्शन घ्यायलाच पाहिजे असे नाही.
१००० पौर्णिमा कशा मोजायच्या हे ठरविण्या आधी इंग्रजी व भारतीय दिनदर्शिके विषयी थोडेसे ..
आपल्या परिचयाचे इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. भारतीय पंचांगात महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्या प्रदक्षणेवरून ठरतात. चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस लागतात.
अमावास्येपासून परत आमावास्येपर्यंत लागणारा वेळ , हाच आपला एक मराठी महिना , यालाच चांद्रमास असे पण म्हणतात. चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो.